
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तरवळ मायंगडेवाडी इथं नवीन वर्गखोलीच्या बांधकामाचं भूमिपूजन!
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच उत्तम शैक्षणिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तरवळ मायंगडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्गखोलीच्या बांधकामाचं भूमिपूजन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते संपन्न झालं.
ग्रामीण भागातील शाळांचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व सुविधायुक्त शैक्षणिक वातावरणाची निर्मिती आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहोत. या नवीन वर्गखोलीमुळं विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी, जिल्हा परिषद पक्षप्रतोद बाबुशेठ म्हाप, पंचायत समिती सभापती प्रविण पांचाळ, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, सरपंच रमेश मालप, वाडीप्रमुख महादेव मायंगडे, उपसरपंच सुयोग मांजरेकर, महिला तालुकाप्रमुख कांचन नागवेकर, विभाग संघटक मिलिंद खानविलकर, पंचायत समिती सदस्य नेहा गवाणकर, युवासेना विभागप्रमुख नंदकुमार कुवार, दादा कुळये, गुणाजी म्हाप, महादेव कुळये, रवी कुळये, संदीप मायंगडे यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.




