
भूसंपादनासाठी ६० कोटी रुपये प्राप्त, निवेंडी एमआयडीसीचा मार्ग मोकळा
रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी येथे प्रस्तावित एमआयडीसीसाठी दोन वर्षापूर्वी घोषणा झाल्यानंतर भूसंपादन प्रक्रियाही राबवण्यात आली होती. मात्र निधी अभावी ही एमआयडीसीचे भूसंपादन रखडले होते. मात्र शासनाकडून आता निधीचा प्रश्न मार्गी लागला असून ९५ हेक्टर जागेसाठी लागणार्या १२० कोटी पैकी ६० कोटी रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे निवेंडी एमआयडीसीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु झाले आहेत.




