
कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे विशेष पुरस्कार, गुणवत्ता पारितोषिक वितरण
रत्नागिरी : येथील कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाचा २०२६ चा विशेष पुरस्कार व गुणवत्ता पारितोषिक प्रदान सोहळा येत्या रविवारी (२९ नोव्हेंबर) दुपारी ३:३० वाजता संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात आयोजित केला आहे. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ठाण्यातील पुरोहित असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर पुरोहित उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी पुरोहित यांचे म्युचुअल फंड गुंतवणूक – काळाची गरज या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या वेळी विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच कऱ्हाडे ज्ञाती बांधवांना उल्लेखनीय कार्यासाठी विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये सौ. प्रतिभा शरद प्रभुदेसाई (स्वामी स्वरूपानंद मंडळाचा स्वरूप योगिनी पुरस्कार), ॲड. संजेश देसाई (संस्थान श्री भार्गवराम परशुराम ट्रस्टी), मंगेश तांबे (आदर्श शिक्षण संस्थाचालक पुरस्कार प्राप्त), सौ. निशा आंबेकर (राज्यस्तरीय अॅथलेटिक स्पर्धेत सहा सुवर्णपदके), वेद जोशी (न्याय शास्त्रातील न्यायशलाका व सुवर्णपदक), विराज आठल्ये (निसर्ग अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमी), ॲड. सौ. मानसी डिंगणकर आणि चैतन्य सरदेशपांडे (मोडी लिपी भाषांतर मंडळावर निवड) यांचा समावेश आहे.
डॉ. चेतन खांडेकर, डॉ. सौ. गायत्री किरकिरे, डॉ. सीमा देवस्थळी, डॉ. मंदार ठाकूर (पीएच. डी. प्राप्त), डॉ. मयुरेश देव, डॉ. शशांक टोळये (सर्व पीएच. डी. प्राप्त), डॉ. अभयराज जोशी (मेरी क्युरी फेलोशिप प्राप्त), अभय पुरोहित (शंखवादन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त), सौ. दीप्ती पंडित (बीएसएनएलतर्फे सम्मानित), हर्षल काटदरे (बालगंधर्व संस्थेचा खाऊवाले पाटणकर पुरस्कार), राधा टिकेकर (मुंबई विद्यापीठ एकपात्री अभिनय सुवर्णपदक) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मानस देसाई आणि व्यवस्थापक समिती सदस्यांनी केले आहे.




