महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम


पुढील काही दिवसांत राज्यात ‘ऑक्टोबर हिट’ची सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

देशातूनही मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या बहुतांश भागातून माघार घेतली आहे. 29 सप्टेंबर रोजी मान्सूनच्या परतीची सीमा कायम होती. आता पुढील दोन ते तीन दिवसांत देशाच्या आणखी काही भागांतून मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे. मात्र, मान्सून पूर्णपणे परतण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.

महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम

मान्सून परतीच्या मार्गावर असला तरी महाराष्ट्रातील वातावरण पूर्णपणे कोरडे झालेले नाही. समुद्राकडून येणारे वारे, स्थानिक वातावरणातील आर्द्रता आणि तापमानातील वाढ यामुळे काही भागांत ढगांची निर्मिती होऊन मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे.सध्या हवामान विभागाच्या ३० सप्टेंबरच्या उपखंडनिहाय इशाऱ्यानुसार कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रासाठी 1ते 6 ऑक्टोबरदरम्यान कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे पाऊस व्यापक किंवा मुसळधार स्वरूपाचा नसून स्थानिक स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button