भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात काठी बांधण्यास प्राणी मित्रांचा विरोध


भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात काठी बांधण्यास येथील प्राणी मित्रांनी विरोध दर्शवला आहे. तालीम घेताना ज्या कुत्र्यांच्या गळ्यात काठी बांधण्यात आली तो वाहनावर आदळल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे आता नेमके करायचे काय, असा प्रश्न नगरपरिषदेला पडला आहे. त्यातच खरेदी केलेले ५०० पट्टे व काठ्याही वाया जाणार आहेत. या उपायापेक्षा दर तीन महिन्यांनी नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची मागणी प्राणी मित्रांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या कमालीची वाढत असून ही कुत्री नागरिकांच्या विशेषतः लहान मुलांच्या अंगावर धावून जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे कुत्र्यांचा त्रास थोडा कमी करण्यासाठी नगरपरिषदेने त्यांच्या गळ्यात मट्टा व काठी बांधण्याचा निर्णय घेतला असून यासाठी ५०० पट्टे व काठ्या उपलब्ध केल्या आहेत. मात्र हे काम नेमके कोणी करायचे, असा प्रश्न उभा ठाकल्याने काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या तालीम सभागृहात नागरिक, प्राणी मित्र यांची बैठक घेतली.
या बैठकीत नगराध्यक्ष सकपाळ यांनी उपस्थित प्राणी रमित्रांना कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक किती भयभीत आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच प्राथमिक स्तरावर तुमच्याच माध्यमातून १०० कुत्र्यांच्या गरयात काठ्या बाधूया, त्यातून त्यांना काय त्रास होतो याचा अभ्यास करुया, जर काही त्रास होत नसेल आणि नागरिकांनाही याचा फायदा होणार असेल तर त्याची अमंलबजावणी करुया, असे आवाहन केल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button