
पटवर्धन हायस्कूलच्या रमा कानविंदे हिचे ‘शब्दवेध’ अभिवाचन स्पर्धेत यश
रत्नागिरी : श्रीमंत मंगेश बापूजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन/आंतरशालेय ‘शब्दवेध’ अभिवाचन आणि निबंध स्पर्धेत येथील पटवर्धन हायस्कूलची विद्यार्थीनी रमा नितीन कानविंदे हिने उत्कृष्ट यश संपादन केले आहे.
या स्पर्धेच्या अभिवाचन प्रकारामध्ये (गट १) तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिला मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच तिला ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत तिच्या उत्कृष्ट सहभागाबद्दल आणि कल्पकता, विचारशक्ती व अभिव्यक्तीच्या उत्तम प्रदर्शनाबद्दल विशेष प्रशस्तिपत्रही प्रदान करण्यात आले आहे.
रमा कानविंदे हिच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला व तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस तिला शुभेच्छा देण्यात आल्या.




