
मुंबई – मडगांव आणि मुंबई – नागपूर दरम्यान ८ साप्ताहिक विशेष गाड्या
सुट्टीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे मुंबई - मडगांव आणि मुंबई - नागपूर दरम्यान ८ विशेष गाड्या चालवणार आहे.
(१) लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगांव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाड्या – (४ सेवा)
गाडी क्रमांक 01029 ही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक ०२.१०.२०२६ (शुक्रवार) आणि दिनांक ०४.१०.२०२६ (रविवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.२५ वाजता सुटेल आणि मडगांव येथे त्याच दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल. (२ सेवा).
गाडी क्रमांक 01030 ही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक ०२.१०.२०२६ (शुक्रवार) आणि दिनांक ०४.१०.२०२६ (रविवार) रोजी मडगांव येथून १६.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. (२ सेवा).
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.
संरचना: ४ वातानुकूलित तृतीय, ११ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
(२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट विशेष – (४ सेवा )
गाडी क्रमांक 02141 ही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक ०२.१०.२०२६ (शुक्रवार) आणि दिनांक ०४.१०.२०२६ (रविवार) रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)
गाडी क्रमांक 02142 ही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक ०२.१०.२०२६ (शुक्रवार) आणि दिनांक ०४.१०.२०२६ (रविवार) रोजी नागपूर येथून १६.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०९.२० वाजता पोहोचेल. (२ सेवा)
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी (केवळ गाडी क्रमांक 02142 साठी), नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
संरचना: ४ वातानुकूलित तृतीय, ११ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
आरक्षण: विशेष गाडी क्रमांक 01029, गाडी क्रमांक 02141 आणि गाडी क्रमांक 02142 साठी आरक्षण *दिनांक ०१.१०.२०२६ रोजी सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावर (www.irctc.co.in) सुरू होईल.
सामान्य दरांसह अनारक्षित डब्यांचे आरक्षण युटीएस प्रणालीद्वारे केले जाऊ शकते.
प्रवासी तिकिटांच्या बुकिंगसाठी ‘रेलवन’ ॲप देखील डाउनलोड करू शकतात.




