
लांजा तालुका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर *
लांजा : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या लांजा तालुका शाखेची नवीन कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते जाहीर करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत तालुका अध्यक्षपदी प्रकाश इंदुलकर, तालुका सचिवपदी अशोक वाघाटे, उपाध्यक्षपदी नंदा डांगरे, कार्याध्यक्षपदी राकेश पोटफोडे, कोषाध्यक्षपदी सुनील कारेकर तसेच प्रसिद्धी प्रमुखपदी विनायक पवार यांची निवड करण्यात आली.
याशिवाय संघटक म्हणून अमोल खिची, सायली म्हेत्रे, बिलाल दुधाळकर, शैलेश रेवाळे, राजेश जंगम आणि शरदचंद्र फुले, तर सल्लागार म्हणून दीपक डोळे आणि उदयचंद्र जाधव यांची निवड करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हा सहसचिव विवेक गावडे, जिल्हा सल्लागार गजानन साळुंखे, जिल्हा संघटक श्रीकांत जाधव तसेच रत्नागिरी तालुका अध्यक्ष कमलेश लाकडे उपस्थित होते.
बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. कर्मचारी हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, संघटना अधिक सक्षम करणे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.




