
महाराष्ट्राचा स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या प्रस्तावावर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पॅरिस येथे सकारात्मक चर्चा!
शेती, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धनासह दुर्गम भागातील संपर्क व्यवस्थेसाठी उपग्रहाचा उपयोग करण्याचा विचार
पॅरिस : World Space Business Week 2026 च्या निमित्ताने पॅरिस येथे महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत Satsearch सोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्रात स्पेस क्षेत्रातील गुंतवणूक, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील नव्या संधींबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीतील विशेष चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे महाराष्ट्राचा स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करण्याचा प्रस्ताव. राज्याच्या विविध क्षेत्रांच्या विकासासाठी या उपग्रहाचा प्रभावी वापर करता येईल का, याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
प्रस्तावित उपग्रहाच्या माध्यमातून शेती, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन तसेच दुर्गम आणि डोंगराळ भागातील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या शक्यतांचा अभ्यास केला जाणार आहे. उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील विविध क्षेत्रांना थेट लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने या प्रस्तावाकडे पाहिले जात आहे.
या संदर्भात सविस्तर तांत्रिक आणि व्यवहार्य अभ्यास करण्यात येणार असल्याची माहिती मा. ना. उदय सामंत यांनी बैठकीत दिली.
स्पेस क्षेत्रात महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण करण्यासोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञान राज्याच्या विकासासाठी वापरण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
या बैठकीस उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दीपेंद्रसिंह कुशवाह, उद्योग आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे आणि संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार उपस्थित होते




