महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे (SIR) सुधारित वेळापत्रक जाहीर


रत्नागिरी, दि. २१ )- विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे (SIR) सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गृहभेटीद्वारे गणना प्रपत्र भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रारूप मतदार याद्या तयार करण्याच्या तांत्रिक प्रक्रियेसाठी हे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
या प्रक्रियेत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी, तसेच दावे व हरकती स्वीकारण्याची कार्यवाही नियोजित मुदतीनुसार पूर्ण केली जाणार आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र नागरिकांना, विशेषतः नवमतदारांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाइन अथवा ऑफलाइन अर्ज सादर करता येईल. प्राप्त दावे व हरकतींची पडताळणी व निपटारा पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत वेळापत्रक, मतदार यादीतील नावाचा शोध, आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत मतदार सेवा पोर्टलला भेट द्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button