प्रा. दिनकर मराठे यांची ५२ व्या अखिल भारतीय प्राच्यविद्या संमेलनाच्या कार्यकारी सदस्यपदी निवड

रत्नागिरी उपकेंद्रासाठी गौरवास्पद उपलब्धी

हरिद्वार येथील पतंजली विश्वविद्यालयात २९ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संपन्न झालेल्या ५२ व्या अखिल भारतीय प्राच्यविद्या संमेलनात कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक प्रा. दिनकर मराठे यांची कार्यकारी सदस्य (Executive Member) म्हणून निवड झाली आहे.
आगामी प्राच्यविद्या संमेलनाच्या निमित्ताने ही निवड अत्यंत महत्त्वाची आहे
.

भारतीय शास्त्रपरंपरा, संस्कृत भाषा, भारतीय संस्कृती आणि प्राचीन ज्ञानपरंपरेचा गौरव व संवर्धन यांना समर्पित असलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील संमेलनात प्रा. मराठे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

संमेलनाच्या आयोजनात प्रा. मराठे यांनी संस्कृत भाषा, योगशास्त्र, पुराणे, वेद, कुंभरहस्य अशा २० हून अधिक विविध विषयांवर आधारित सत्रांचे यशस्वी नियोजन व समन्वय केला. त्यांच्या या योगदानामुळे संमेलनाच्या शैक्षणिक व वैचारिक उपक्रमांना विशेष चालना मिळाली.

संमेलनादरम्यान पतंजली विश्वविद्यालयाचे कुलाधिपती योगगुरू आचार्य बाबा रामदेव, कुलपती आचार्य बाळकृष्ण आणि नवी दिल्ली येथील केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू आचार्य श्रीनिवास वरखेडी यांच्या उपस्थितीत प्रा. मराठे यांचा संमेलनासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.

प्रा. दिनकर मराठे यांची कार्यकारी सदस्यपदी निवड आणि संमेलनाच्या यशस्वी आयोजनातील त्यांचे योगदान हे रत्नागिरी उपकेंद्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या शैक्षणिक व संघटनात्मक कार्यामुळे संस्कृत आणि भारतीय ज्ञानपरंपरेच्या प्रसाराला नवी दिशा मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button