एनएसएस स्वयंसेवकांनी उक्षी येथे बांधला बंधारा

रत्नागिरी : अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उक्षी येथे श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला.
एनएसएस विभागाचे निवासी श्रमसंस्कार उक्षी जिल्हा परिषद प्राथमिक पूर्ण मराठी शाळा नं. १ येथे सुरू आहे. शिबिरादरम्यान एनएसएस स्वयंसेवकांनी विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामध्ये श्रमदानातून बंधारा बांधण्याचे काम विशेष उल्लेखनीय ठरले.
स्वयंसेवकांनी एकजुटीने व उत्साहाने श्रमदान करून बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण केले. या उपक्रमामुळे पाण्याचे संवर्धन, जलसंधारण आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. श्रमदानातून सामाजिक बांधिलकी, संघभावना आणि स्वावलंबनाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली. एनएसएस स्वयंसेवकांच्या या समाजोपयोगी कार्याचे ग्रामस्थ व शाळेतील शिक्षकांनी कौतुक केले. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ‘सेवेतून व्यक्तिमत्त्व विकास’ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्दिष्टाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या शिबिरामध्ये कार्यक्रमाधिकारी अभिजीत भिडे, निलेश जोशी, भूषण केळकर, मनस्वी लांजेकर, सारिका माळी यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button