
बसणी येथे ठाकरे शिवसेनेच्या शाखेतर्फे गडकिल्ले बांधणी स्पर्धा उत्साहात संपन्न

रत्नागिरी : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा बसणी यांच्या वतीने भव्य गडकिल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून, या स्पर्धेत गावातील ४६ मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत तब्बल २७ गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शिवसेना शाखा, बसणी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
गावातील बच्चे कंपनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आणि त्यांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांप्रती आत्मीयता जागृत व्हावी, या उद्देशाने लहान व मोठा अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धकांनी अतिशय कल्पकतेने शिवनेरी, रायगड, प्रतापगड, मुरुड-जंजिरा, पन्हाळगड, विशाळगड आणि पावनखिंड या ऐतिहासिक स्थळांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या होत्या.
स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे :
मोठा गट : प्रथम क्रमांक (किल्ले शिवनेरी – जुन्नर, पुणे) : वेदांती अभिषेक शिंदे, ईश्वरी अभिषेक शिंदे, रिया आकाश शिंदे, अद्विका अजय शिंदे.
द्वितीय क्रमांक (किल्ले मुरुड-जंजिरा) : आर्यन जितेंद्र रेवणे, श्री जितेंद्र रेवणे.
तृतीय क्रमांक (पावनखिंड, पन्हाळगड – विशाळगड) : साई सुहास झगडे, श्लोक प्रदीप हेदवकर, शिवम अभिजित झगडे, आराध्य मंदार झगडे.
लहान गट : प्रथम क्रमांक (किल्ले मुरुड-जंजिरा) : आरंभ रवींद्र पारकर
द्वितीय क्रमांक (किल्ले रायगड) : वेद वैभव झगडे
तृतीय क्रमांक (किल्ले प्रतापगड) : सान्वी सचिन गावडे
या स्पर्धेचे बक्षीस वितरण ज्येष्ठ शिवसैनिक अनंत मयेकर, सरपंच समृद्धी मयेकर, उपसरपंच किशोर नेवरेकर, विभाग प्रमुख महेश नेवरेकर आणि बसणी शाखाप्रमुख समीर हेदवकर यांच्या हस्ते पार पडले. सर्व विजेत्यांना तसेच सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना शालेय उपयोगी वस्तू भेट देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुहास झगडे, प्रकाश लोगडे, आशा नेवरेकर, अवंती मयेकर, सृष्टी मयेकर, मोहन धांगडे, अनिल मयेकर, संतोष नेवरेकर, अमित धांगडे, प्रदीप हेदवकर, आराध्य नेवरेकर आणि सचिन नेवरेकर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसणी शिवसेना शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.




