
नवनिर्माण देशभक्तीपर गीत व नृत्य स्पर्धावरफाटक- नवनिर्माण चे वर्चस्व

नवनिर्माण हाय शाळा आयोजित १२ व्या आंतरशालेय देशभक्तीपर गीत गायन आणि नृत्य स्पर्धा अभूतपूर्व उत्साही प्रतिसादात संपन्न झाल्या. ११ शाळांच्या संघांनी सहभाग असणाऱ्या स्पर्धेत फाटक हायस्कूल आणि नवनिर्माण हाय यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकले. कोस्टगार्डच्या कमाडंट नेहा भोला यांचे हस्ते विजयी संघाने पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशप्रेम, शिस्त, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व विशद केले.
नवनिर्माण हाय (CBSE) शाळा सलग १२ वर्षे देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा घेत आहे.


स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश पारतंत्र्य आणि जूलूमशाही विरोधात बाल आणि युवा मनात देशप्रेमाची धगधगती ज्वाला प्रज्वलित व्हावी, मुलांना तो विचार आणि संस्कार मिळावे यासाठी देशाचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते थोर विचारवंत, कवी रविंद्र नाथ टागोर यांनी १८६९ मध्ये प्रथम ( बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले) वंदेमातरंम गीत गायले. आज नव्या झेन अल्फा पिढीपर्यंत हा देश प्रेमाचा , अभिव्यक्ती आणि निर्भयतेचा संदेश जाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी स्पर्धा उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. दिलीप सरदेसाई उपस्थित होते.
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा :
प्राथमिक गट (इयत्ता १ ली ते ५ वी)
प्रथम क्रमांक – नवनिर्माण हाय इंग्लिश मिडीयम स्कूल रत्नागिरी.
द्वितीय क्रमांक – माने इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरी.
तृतीय क्रमांक – ऑनेस्ट गुरुकुल रत्नागिरी.
उत्तेजनार्थ – ल. ग. पटवर्धन शाळा रत्नागिरी.
माध्यमिक गट (इयत्ता ६ वी ते ९ वी)
प्रथम क्रमांक – फाटक हायस्कूल रत्नागिरी.
द्वितीय क्रमांक – पोदार इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरी.
तृतीय क्रमांक – डी.जे. सामंत हायस्कूल पाली रत्नागिरी.
उत्तेजनार्थ – माने इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरी.
देशभक्तीपर नृत्य स्पर्धा – माध्यमिक गट (इयत्ता ६ वी ते ९ वी)
प्रथम क्रमांक – नवनिर्माण हाय इंग्लिश मिडीयम स्कूल रत्नागिरी.
द्वितीय क्रमांक – मराठा मंदिर ग्लोबल स्कूल रत्नागिरी.
तृतीय क्रमांक – जगद्गुरू नरेंद्र महाराज हायस्कूल नाणीज रत्नागिरी.
उत्तेजनार्थ – डी. जे. सामंत स्कूल रत्नागिरी.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून जेष्ठ संगीत तज्ञ श्री राम तांबे सर , सौ अंजली लिमये मॅडम व नृत्य विशारद सौ शिल्पा मुंगळे मॅडम यांनी जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमाचे आयोजन संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये मॅडम आणि नवनिर्माण हाय मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा झारापकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.




