
शहरातील टी.आर.पी. परिसरातून महिलेचे अपहरण; पोलिसांकडून शोधासाठी मदतीचे आवाहन
रत्नागिरी, दि. १८ ): शहरातील रेल्वे ब्रीज, टी.आर.पी. परिसरातील रसवंती गृहाजवळून एका ३९ वर्षीय महिलेला पळवून नेऊन तिचे अपहरण केल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
अपहरण झालेल्या महिलेची ओळख व वर्णन:
- नाव: स्वाती एकनाथ म्हात्रे (वय ३९ वर्षे)
- पत्ता: शांतीनगर, रसाळवाडी, नाचणे, रत्नागिरी
- शिक्षण: नववीपर्यंत
- वर्णन: उंची सुमारे पाच फूट, बांधा मध्यम, रंग सावळा, चेहरा गोल, डोळे व केस काळे, नाक सरळ.
- इतर माहिती: बेपत्ता होताना त्यांच्या पायात चप्पल होती आणि त्यांच्याकडे मोबाईल फोन नव्हता.
या महिलेबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास किंवा त्या कुठेही आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.




