देवगड समुद्रात बेकायदा मासेमारी करणारी कर्नाटकची ‘ हनुमा ध्याना’ हायस्पीड ट्रॉलर जप्त

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने १५ दिवसांच्या आत सलग दुसरी कठोर कारवाई केली आहे.कर्नाटकातील मलप्पे बंदरातील ‘हनुमा ध्याना’ ही हायस्पीड ट्रॉलर नौका देवगडसमोरील सागरी हद्दीत पकडून जप्त करण्यात आली. ही नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून तिच्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

मध्यरात्री समुद्रात थरारक कारवाई

दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ०२.०० वाजता सुनियोजित गस्तीदरम्यान ही कारवाई झाली. आचरा समोरील समुद्रात सुमारे ९-१० नॉटिकल मैल अंतरावर ही नौका वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. विभागाची नौका पाहताच सदर नौकेने पळ काढला होता. सदर हायस्पीड नौकेस पाठलाग करून देवगड समोरील समुद्रात पकडण्यात आले.नौकेवर तांडेलसह एकूण सात खलाशी होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button