
दापोलीतील पतसंस्थेतील कथित २.६९ कोटींचा गैरव्यवहार; १३ जणांवर गुन्हा
दापोली १७:- दापोली येथील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत २ कोटी ६९ लाख ५० हजार रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी १३ जणांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखापरीक्षणात बनावट कागदपत्रांची माहिती असतानाही त्याआधारे कर्ज मंजूर करून संस्थेच्या नियमांचा भंग केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच ठेवीदारांच्या ठेवींचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. कोरोनाकाळात काही व्यक्तींनी आपण आरोग्य विभागातील कर्मचारी असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर करीत असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे.




