
शासनाचा महाविद्यालय आणि शाळांना इशारा : फुलराणी कक्ष उभारा, अन्यथा जुलैचा पगार अडणार!
रत्नागिरी २०:- *रत्नागिरी जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना “फुलराणी कक्ष” तातडीने स्थापन करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले असून, त्याची अंमलबजावणी न झाल्यास जुलै २०२६ चे वेतन देयक स्वीकारले जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे
परिणामी, जुलै महिन्याचा पगार वेळेवर मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महाविद्यालयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ३८ शाळा आणि महाविद्यालयांना वरील विषयासंदर्भात रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांनी आदेश बजावला आहे.




