
रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत खेडशी तायकांदो सेंटरची उल्लेखनीय कामगिरी
रत्नागरी : देवरुख (ता. संगमेश्वर) येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत तायक्वांदो स्पोर्ट्स सेंटर खेडशी (रत्नागिरी) या सेंटरच्या खेळाडूंनी यशस्वी कामगिरी केली. ही स्पर्धा रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन आणि संगमेश्वर तायक्वांदो तालुका अकॅडमी व नगरपंचायत देवरुख तायक्वांदो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती.
यात जिल्हाभरातून सुमारे ६०० खेळाडू सहभागी झाले होते. तायक्वांदो स्पोर्ट्स सेंटर खेडशी रत्नागिरी या स्पर्धेत (क्यूरोगी फाईट) या प्रकारात सहभाग घेऊन १० सुवर्णपदक, ५ रौप्य पदक आणि ४ कांस्य पदक तसेच पूमसे प्रकारात ४ रौप्य पदक प्राप्त केली. या स्पर्धेत अमित जाधव, रिधान स्वप्नील कदम, ईरा कुलदीप खातू, निधी दीपक पवार, आदित्य किशोर साळवे, शिवांक प्रतीक झिमन, आरोही हेमंत जाधव, आर्या किशोर साळवे, सुयश संतोष झोरे आणि नेहा राजेंद्र पवार यांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. गार्गी निखिल आंब्रे, नीरजा संदीप कांबळे, सांची सचिन कांबळे, अथर्व अनंत पांचाळ, स्वरूप प्रदीप साळुंखे यांनी रौप्य पदक, तर अर्हा अमरदीप आयरे, पूर्वी दामोदर चव्हाण, ओजस्वी संदीप कांबळे, अंतरा नंदकुमार सावंत यांनी कांस्यपदक पटकावले. पूमसे या प्रकारात श्रीमयी प्रतीक झिमन आणि अर्हा अमरदीप आयरे निरजा संदीप कांबळे आणि स्वरा मंगेश जाधव यांनी रौप्य पदक प्राप्त केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल तायक्वांदो स्पोर्ट्स सेंटर खेडशी रत्नागिरी या संघाचे रत्नागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा आणि खजिनदार शशांक घडशी तसेच खेडशी तायकांदो सेंटर या क्लबचे अध्यक्ष सुबोध विजय कांबळे आणि राजेंद्र पवार, प्रमुख प्रशिक्षक अमित जाधव, सहाय्यक प्रशिक्षक प्रतीक पवार आणि सुमेधा जाधव तसेच रत्नागिरी अर्बन बँकचे संचालक सुजित झीमण यांनी सर्व विजेते खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




