जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची संगमेश्वर तालुका कार्यकारिणी जाहीरमनिष जाधव तालुकाध्यक्ष, वैभव जाधव सचिव तर निलेश पिळणकर कोषाध्यक्ष


संगमेश्वर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या संगमेश्वर तालुका कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.

यामध्ये मनिष जाधव यांची तालुकाध्यक्षपदी, वैभव जाधव यांची तालुका सचिवपदी तर निलेश पिळणकर यांची तालुका कोषाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. गजानन साळुंखे, जिल्हा कोषाध्यक्ष श्री. विवेक गावडे, आरोग्य सहाय्यक संदीप खेडसकर, विनोद शिंदे, आरोग्य सेवक शिवराज शेट्ये, संतोष भोसले, विश्वनाथ घाणेकर, सुमेध यादव, राजेंद्र घाणेकर, आरोग्य सेविका श्रीमती तेजस धुमक, श्रीम. डी एस सांडीम तसेच हिवताप कर्मचारी संघटनेचे संजय मांडवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून संघटना अधिक बळकट करण्यासाठी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button