संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे शेवरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात ५० कोंबड्या ठार


संगमेश्वर तालुक्यातील करको तर्फे संगमेश्वर शेवरवाडी येथे बिबट्याने कुक्कुटपालन व्यवसायासाठी उभारलेल्या शेडमध्ये प्रवेश करत तब्बल ५० कोंबड्यांचा फडशा पाडल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. कोंबड्यांच्या आवाजाने बिबन्याने अखेर जंगलात धूम ठोकली. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे ग्रामस्य भयभीत झाले असून विद्या विनायक नाचरे यांचे हजारोंचे नुकसान झाले आहे.
नाचरे यांचा गेली अनेक वर्षे कुक्कुटपालन व्यवसाय आहे. या व्यवसायातून मिळणार्‍या उत्पन्नातून त्याकुटुंबाचा गाडा हाकतात, मंगळवारी पहाटे बिबट्याने कुक्कुटपालन व्यवसायासाठी उभारलेल्या शेडमध्ये प्रवेश केला अन कोंबड्यांवर हल्ला चढवला. बिबट्याच्या हल्ल्यात ५० हून अधिक कोंबड्या ठार झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button