झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वर्ल्ड रेकॉर्ड! सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम मोडला, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू!

Brendan Taylor Breaks Sachin Tendulkar Record : झिम्बाब्वेचा संघ जवळपास एका दशकानंतर वनडे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा स्टार फलंदाज ब्रेंडन टेलरने वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे. झिम्बाब्वेच्या या अनुभवी फलंदाजाने भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. तसेच या रेकॉर्डवर स्वत:चं नाव कोरलं आहे. कोणता आहे तो रेकॉर्ड? जाणून घ्या.

ब्रेंडन टेलरने मोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. त्यापैकी एक रेकॉर्ड म्हणजे, सर्वात जास्त वेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा रेकॉर्ड. सचिनने २२ वर्षे ९१ दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. आता ब्रेंडन टेलरने हा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. ब्रेंडन टेलरने २२ वर्षे १४८ दिवस झिम्बाब्वेचं प्रतिनिधित्व केलं आहे. यासह तो आंतरराष्ट्रीय सर्वात जास्त वेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू सनाथ जयसूर्या या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. जयसूर्याने २१ वर्षे १८४ दिवस श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं. तर या रेकॉर्डमध्ये चौथ्या स्थानी असलेल्या जावेद मियादांदने २० वर्षे २७२ पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. गेल्या १३ वर्षांपासून हा रेकॉर्ड कुठल्याही खेळाडूला मोडता आला नव्हता. अखेर, ब्रेंडन टेलरने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा आणि सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड अजूनही सचिन तेंडुलकरच्या नावे कायम आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची यादी

ब्रेंडन टेलर (झिम्बाब्वे)- २२ वर्षे १४८ दिवस- (२००४ पासून)
सचिन तेंडुलकर (भारत) – २२ वर्षे ९१ दिवस- (१९८९- २०१२)
सनथ जयसूर्या (भारत)- २१ वर्षे १८४ दिवस- (१९८- २०११)
जावेद मियांदाद (पाकिस्तान)- २० वर्षे २७२ दिवस ( १९७५- १९९६)
शॉन विलियम्स (झिम्बाब्वे)- २० वर्ष १८७ दिवस (२००५-२०२५)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button