चिपळूणमध्ये जोरदार वाऱ्याने झाड कोसळले; चार-पाच दुचाकींचे नुकसान


चिपळूण : शुक्रवारी दुपारी मुसळधार पावसासह आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे पंचायत समिती कार्यालयासमोर मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत झाडाखाली उभ्या असलेल्या चार ते पाच दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने त्या वेळी परिसरात वर्दळ कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेनंतर प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन झाड हटविण्याचे काम सुरू केले. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button