
मालगुंड शिक्षण संस्थेचे दानशूर व्यक्तिमत्त्व कै.बाबाराम पर्शराम कदम जयंतीदिनी विद्यार्थी, शिक्षक सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या माजी खजिनदार व दानशूर व्यक्तिमत्व कै.बाबाराम पर्शराम कदम जयंतीदिनी इ.१२ गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा जाकादेवी कनिष्ठ महाविद्यालयात कदम परिवारातर्फे मोठ्या थाटात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.सुनिल मयेकर उपस्थित होते,कै. बाबाराम पर्शराम कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा.विवेक परकर सर,कोषाध्यक्ष मा.संदीप कदम,सी.ई.ओ. मा.किशोर पाटील सर, सहसचिव मा.श्रीकांत मेहेंदळे, संचालक मा.रोहित मयेकर,संचालक मा.परेश हळदणकर तसेच कदम परिवारातील एडवोकेट विनय आंबुलकर, एडवोकेट सौ. शाल्मली आंबुलकर ,सौ.श्रावणी कदम ,संस्थेचे हितचिंतक मा.प्रकाश कांबळे, मुख्याध्यापक मा.नितीन मोरे सर ,ज्येष्ठ शिक्षक मा.अरुण कांबळे सांस्कृतिक विभाग प्रमुख मा.संतोष पवार, क्रीडा शिक्षक मा.संतोष सनगरे ,मा.किशोर नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मा.नितीन मोरे यांनी केले.त्यानंतर इ. बारावी प्रथम अनुक्रमे तीन क्रमांक *कला शाखा* - कु.सुजल रमेश गराटे ७७.३३%, कु.समृद्धी रविंद्रे खापरे ६५.३३%,कु.नेहा नारायण किंजळे ६१.१७ *वाणिज्य शाखा* कु.ओकार संदीप मायंगडे ८२.१७% . कु.वैष्णवी अंनत माचीवले ७६.६७% कु.आर्य अभिषेक जोशी ७६.३३% , *विज्ञान शाखा* कु.वैष्णवी वासुदेव गोवळकर ७२.१७% कु.अदिती अनिल जाधव ६५.३३% कु.सौरभ प्रशांत बळकटे ६३.८३% तसेच इयत्ता *दहावीचे* प्रथम तीन क्रमांक कु.साक्षी कुमार नाईक ८४.८०% कु.आर्या चंद्रकांत धनावडे ८३.२०% कु.ऋत्वीराज आशिष नाचरे ८१.४०% *सी.ई.टी* परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेले कु.वैष्णवी वासुदेव गोवळकर ९७.९६५ कु.ऋतुजा राजेश निवेंडकर ८१.०११ कु.अदिती अनिल जाधव ७६% यांना पारितोषिके व बुके देऊन *कदम परिवाराच्या वतीने मान्यवराच्या हस्ते गौरव करण्यात आले. तसेच या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा असणाऱ्या *मान्यवर शिक्षकांना देखील कदम परिवाराच्या वतीने गौरविण्यात आले. या कार्यक्रमात कदम परिवाराच्या वतीने एड.सौ. शाल्मली आंबुलकर यांनी मार्गदर्शनपर मनोगतात कदम परिवार नेहमी शाळा व संस्थेसोबत असेल अशी भावना व्यक्त करत आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करावेत. विविध कोर्सेसमधून आपले करिअर घडवावे, असे आवाहन केले व शिक्षण संस्थेच्या कार्याचे कौतुक केले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर सी.ई.ओ.किशोर पाटील व क्रीडाशिक्षक मा.संतोष सनगरे यांनीही गुणवंताना व कै.बाबाराम कदम जयंती निमित्त मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. संस्था अध्यक्ष मा.सुनिल मयेकर यांनी संस्थेच्या विकासात्मक वाटचाल यांवर भाष्य करून कै. बाबाराम कदम यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करुन कदम परिवाराला धन्यवाद दिले.
मा.अरूण कांबळे सर यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मा.वैभव खानोलकर सर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी मोठया संख्येने विद्यार्थीवर्ग व पालक उपस्थित होते.
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही कदम परिवारामार्फत गुणगौरव सत्कार समारंभ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.




