फ्रेंचायसीच्या आमिषाने खेर्डीतील उद्योजकाची १०.२० लाखांची ऑनलाइन फसवणूक


चिपळूण : नामांकित डिलिव्हरी कंपनीची फ्रेंचायसी मिळवून देण्याचे आमिष दाखवत खेर्डी येथील एका तरुण उद्योजकाची तब्बल १० लाख २० हजार १७४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौस्तुभ अविनाश अभयंकर (वय २८, रा. खेर्डी बाजारपेठ) यांच्या फिर्यादीवरून अभय महाजन आणि प्रियांका सिंग यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संशयितांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून एका डिलिव्हरी कंपनीची फ्रेंचायसी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी नोंदणी, प्रक्रिया शुल्क, सुरक्षा ठेव तसेच इतर विविध कारणे सांगून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने एकूण १० लाख २० हजार १७४ रुपये स्वीकारले.

मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतरही फ्रेंचायसी न देता संशयितांनी टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कौस्तुभ अभयंकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलीसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button