
दापोली तालुक्यातील नादिया रुमाणे हिला युनिव्हर्सिटी ऑफ हर्टफोर्डशायरतर्फे आउटरीच ऍम्बेसेडर पुरस्कार
कोकणातील गुणवत्तेने जागतिक पातळीवर पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकाविला आहे. दापोली तालुक्यातील पंचनदी कोळथरे येथील मूळ रहिवासी आणि सध्या सौदी अरेबियातील अल खोबर येथे वास्तव्यास असणारे रियाझ रुमाणे आणि शफीका रुमाणे यांची कन्या नादिया रुमाणे हिला युनायटेड किंगडममधील (लंडन) नामांकित युनिव्हर्सिटी ऑफ हर्टफोर्डशायरतर्फे अत्यंत प्रतिष्ठेचा आउटरीच ऍम्बेसेडर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कोकणवासीयांकडून तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.www.konkantoday.com




