
चिपळूण नगरपरिषदेकडून पाण्याची परस्पर विक्री, काही कर्मचारी सामील असल्याचा संशय
चिपळूण नगरपरिषदेच्या काही कर्मचार्यांकडून पाण्याची परस्पर विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे. रात्रीच्यावेळी ही विक्री होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मोजक्याच पावत्या बनवून हजारो रुपयांचा घोळ झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या एका नगरसेवकाने याची तोंडी तक्रार मुख्याधिकारी संजय जाधव यांच्याकडे केल्यानंतर वाहन विभागातील कर्मचारी बदलण्याची कारवाई सुरू झाली आहे. नगरपरिषदेचे दोन ठिकाणी पंप हाऊस आहेत. येथे ५ हजार लीटरचा टँकर भरुन मागणीनुसार पाणी पुरवले जाते. शहरात खासगी स्वरुपात टँकर हवा असल्यास १५०० रुपये तर शहराबाहेर ३००० हजार रुपये इतके शुल्क आकारले जाते.
www.konkantoday.com




