
गोड्या पाण्यातील मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी चिपळुणात मत्स्यबीज केंद्र उभारणार
रत्नागिरी जिल्ह्यात गोड्या पाण्यातील मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी चिपळूण येथे १०० टक्के राज्य शासनाच्या अनुदानातून मत्स्यबीज केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार शेखर निकम यांनी या संदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, आवश्यक शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आल्यास पूर्णपणे शासकीय अनुदानातून मत्स्यबीज केंद्र सुरू करण्यात येईल, असे मंत्री राणे यांनी लेखी पत्राद्वारे कळवले आहे.
मत्स्यबीज जिल्ह्यात सध्या केंद्र उपलब्ध नसल्याने गोड्या पाण्यातील मत्स्यपालन करणार्या शेतकर्यांना दर्जेदार मत्स्यबीज मिळण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय विभागाकडे हस्तांतरित ४२ तलाव असून आहेत. मात्र जिल्ह्यात उत्पादनाची सुविधा नसल्याने मत्स्य उत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे. वाशिष्ठी नदीसह उपलब्ध जलस्रोत, भविष्यातील रिव्हर रॅचिंग प्रकल्प आणि नव्याने उभारले जाणारे तलाव यांचा विचार करता येथे मत्स्यबीज केंद्र उभारणे अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी भूमिका आमदार निकम यांनी शासनाकडे मांडली होती.www.konkantoday.com




