चिपळुणातून गणेशोत्सवासाठी ५५ एसटी बसेसचे बुकिंग, जादा बसेसचे नियोजन


काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून त्यासाठी गावच्या विशेने येणार्‍या कोकणवासियांचे आतापासून नियोजन सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यातील कोकणवासियांसाठी चिपळूण आगार प्रशासनाने जादा एस्टी बसेसचे नियोजन केले आहे. त्यानुसार ५५ बसेसचे बुकिंग करण्यात आले आहे. दरम्यान, दरवर्षी प्रवाशांची संख्या लक्षात घेता जादा गाड्यांमध्ये आणखी वाढ होणार असल्याची माहिती आगार प्रशानाकडून देण्यात आली आहे.
कोकण आणि गणेशोत्सव हे अनोखे नाते असून या वैशिष्ट्य पूर्ण सणाच्या पार्श्वभूमीवर बहुसंख्य कोकणवासीय गावच्या दिशेने येत असतात. गणेशोत्सवास अद्याप काही दिवसांचा कालावधी असला तरी कोकणवासियांचे गावच्या दिशेने येण्याच्यादृष्टीने आतापासून नियोजन सुरु झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button