
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक गोंधळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक गोंधळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. सरकारी आणि अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक असूनही खुल्या प्रवर्गातील (ओपन) अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. दुसरीकडे, विनाअनुदानित (प्रायव्हेट) महाविद्यालयांमधील जागा वेगाने भरत असताना ७० ते ८० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी वणवण भटकावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.www.konkantoday.com




