
राजापूर तालुक्यातील जैतापूर ते हातिवले महामार्गावर पडवे येथे भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार
राजापूर तालुक्यातील जैतापूर ते हातिवले सांगरी महामार्गावर पडवे स्टॉपलगत असलेल्या मोरीवर झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीला आली. गौरव कृष्णा पुजारी असे मयत तरूणाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार साखर गावचे पोलीसपाटील रोहीदास कांबळी हे शुक्रवारी सकाळी लग्नासाठी जात असताना सागरी महामार्गावरील पडवे स्टॉपच्या पुढे असलेल्या मोरीच्या खालील बाजूला दुचाकीचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत पोलिसांनी माहिती देताच नाटे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली.www.konkantoday.com




