
सर्पदंश झाल्याने महिलेचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील गोळप धोपटवाडी येथे सर्पदंश झाल्याने वृद्धेचा मृत्यू झाला. अनिता अनंत उभारे (६०, रा. गोळप धोपटवाडी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. अनिता यांना १५ ऑगस्ट रोजी गोळप येथे शेतात काम करताना सर्पदंश झाला होता. यानंतर त्यांना उपचारासाठी प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी व नंतर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी नोंद पूर्णगड पोलिसात करण्यात आली आहे.




