फसवणुकीच्या उद्देशाने ग्राहक रजिस्टर चोरी, संशयित आरोपीला कर्नाटकमधून अटक


राजापूर व संगमेश्वर येथील हॉटेलमधील ग्राहक नोंदणी रजिस्टर चोरी प्रकरणातील चार संशयित आरोपींच्या शोधार्थ कर्नाटकात गेलेल्या राजापूर व संगमेश्वर पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणातील अर्शद अहमद निसार अहमद पोकाकी (२५, रा. मुंडगोड, जि. उत्तर कन्नड, कर्नाटक) या संशयित आरोपीला पोलिसांनी कर्नाटकातील हरपन्नहळ्ळी येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने जेरबंद केले आहे.
दरम्यान, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधील हॉटेल व लॉजिंगमधील नोंदणी रजिस्टर चोरी करून ती दुसर्‍या टोळीला विकण्याचे काम ही टोळी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या रजिस्टरमधील ग्राहकांचे मोबाईल क्रमांक वापरून त्यांना ब्लॅकमेल करणे, फसवणूक करणे व खंडणी उकळण्याचे प्रकार कर्नाटकातील दुसरी मोठी टोळी करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button