रत्नागिरीच्या गणेशोत्सवाला मिळवून देवू जागतिक ओळख नागरिकांनी ‘Bappa.org’ वर नोंदणी करावी- जिल्हाधिकारी मनुज जिंदल


रत्नागिरी, दि. 21 ) : गणेशोत्सव जागतिक स्तरावर नेण्यासाठी व या गौरवशाली परंपरेला युनेस्कोचा (UNESCO) वारसा दर्जा व आंतरराष्ट्रीय मानांकने मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रत्नागिरीची गणेशोत्सव परंपरा ही अत्यंत गौरवशाली आणि ऐतिहासिक आहे. आपल्या जिल्ह्यातील ही संस्कृती, कला आणि परंपरा जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. सर्व जिल्हावासियांनी, गृहनिर्माण संस्थांनी आणि गणेश मंडळांनी Bappa.org वर नोंदणी करून या लोकचळवळीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण, पारंपरिक व ऐतिहासिक वारसा असलेल्या घरगुती गणेशोत्सवाची माहिती, कौटुंबिक विधी, सजावट व खाद्यपरंपरा नागरिकांनी Bappa.org या पोर्टलवर अपलोड कराव्यात.
पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या नागरिकांना राज्य शासनाचे अधिकृत ‘Digital Cultural Preserver Certificate’ देऊन सन्मानित करण्यात येईल.
जिल्ह्यातील मूर्तिकार, कारागीर, लोककलावंत आणि संबंधित व्यक्तींनी आपल्या कौशल्याची माहिती या डिजिटल मंचावर नोंदवावी.
00000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button