कोल्हापुरी पायताण, म्हैस, बैलगाडी, ट्रॅकर घेऊन शेतकरी गोकुळ बचावसाठी रस्त्यावर, संघर्ष मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक!

Kolhapur-Gokul President : गोकुळमधील सत्तासंघर्षामुळे कोल्हापूरसह राज्य, देशपातळीवरील वातावरण तापले आहे. काटावरील बहुमतामुळे अध्यक्ष निवडीचा पेच निर्माण झाला. अध्यक्ष निवडीचे प्रकरण न्यायालयात गेले असतानाच महायुतीकडून पाच तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आल्याने कोल्हापूरसह राज्यात संतापाची लाट पसरली.

या निर्णयाविरोधात आज, काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्यावतीने संघर्ष मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाय शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

विशेष म्हणजे मोर्चात कोल्हापुरी पायताण, म्हैस, बैलगाडीसह शेतकऱ्यांनी आणले बॅनर्स चर्चेचा विषय बनले आहेत. कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा, लक्षात ठेवलंय २०२९ हे कोल्हापूर हाय’ म्हणत बरं झालं सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीचे २५ संचालक निवडून आले, नाहीतर भाजपला २६ स्वीकृत संचालक घेऊन बहुमताचं गणित जुळवावं लागलं असतं. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणारे विचार करा यांनी विधानसभेसाठी काय काय केलं असेल? ही संघर्षाची शेवटची दिवाळी असू दे, हे कोल्हापूर हाय असं सुद्धा एका बॅनरमध्ये म्हटलं आहे.

“एक खासदार कमी होता म्हणून राजीनामा देणारे अटलजी कुठे? आणि एक संचालक कमी आहे म्हणून चार संचालक नियुक्त करणारे कुठे?” गोकुळचा निर्णय बघितला आणि वाटलं इंग्रज आणि यांच्यात फरक काय राहिला? भारत स्वातंत्र्य करण्याची वेळ आलीये?, अशी विचारणा सुद्धा करण्यात आली आहे. दुसरीकडे ‘इडा-पिडा टळू दे’ म्हणत बॅनर सुद्धा लक्ष वेधून घेत आहेत. ऐतिहासिक दसरा चौकातून कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांवर हा विराट मोर्चा निघणार आहे.

मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून शेतकरी मोठ्या संख्येने दसरा चौकात जमा होवू लागले आहेत. ऐन दिवाळीसणातच मोर्चा निघत असल्याने मोर्चात शेतकरी सहभागी होणार का हा प्रश्न उपस्थित केला गेला होता. मात्र आज सकाळपासून एकजुटीने शेतकरी बांधव मोर्चात सहभागी होत असल्याने वाहतुकीचे कोंडी झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button