
रत्नागिरी विभागात अखेर राजमाता जिजाऊ बसेसचे आगमन
रत्नागिरी विभागात अखेर राजमाता जिजाऊ बसेसचे आगमन झाले आहे. आज सोमवार दि. 25 मेपासून जिल्हांतर्गत, कोल्हापूर, मिरजसह इतर लांब पल्ल्याच्या अंतरावर प्रवासाला सुरूवात झाली आहे.रत्नागिरी आगारासाठी तब्बल 18 बसेस आल्या आहेत.भगव्या रंगाची बस प्रवाशांच्या पसंतीस पडली असून वाढत्या गर्दीमुळे उभे रहावे लागत होते मात्र नव्या बसेसमुळे अडचण दूर होणार आहे, अशा प्रतिक्रीया प्रवाशांनी दिल्या आहेत. रत्नागिरी विभागात बसेसची कमतरता भासत असल्यामुळे वेळापत्रक बिघडले होते




