गुहागर विकास आराखड्यावर शहरवासियांच्या ४११ हरकती


नगरपंचायतीच्या विकास आराखड्याला सुरुवातीला शहरवासियांनी जोरदार विरोध  केला होता. १८ मीटरचा रस्ता नऊ मीटरवर आणून चुकीच्या पद्धतीने – झालेल्या आरक्षणावर बोट दाखवून अनेकांनी हरकती घेतल्या होत्या. सुमारे १५००हून अधिक दाखल झालेल्या हरकतींवर काही मोजकेच बदल करून मार्च महिन्यामध्ये नव्याने विकास आराखडा नागरिकांसमोर ठेवण्यात आला आहे. या विकास आराखड्यावरही शहरवासियांमधून नाराजीचा सूर उमटला. अपेक्षित असलेल्या रस्त्याची रुंदी कमी झालेली नाही, ज्या ठिकाणी विस्ताराला जागा आहे अशा ठिकाणी हरितपट्टा जाहीर केल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त झाली आहे. मात्र, यावेळी केवळ ४११ हरकती दाखल झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button