
गणपती स्पेशल गाड्यांचे बुकिंग दोन टप्यात घ्या, कोकण विकास समितीचे निवेदन
कोकण मार्गावर धावणार्या गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण एकाच वेळेला अप आणि डाऊन दोन्ही दिशांसाठी सुरू कैले जाते. यामुळे तिकिट खिडकी उघडल्यानंतर काही मिनिटातच आरक्षण फुल्ल होते. कोकणवासियांच्या सेवेसाठी गणपती स्पेशल गाड्यांचे बुकिंग दोन दप्यात घ्यावे, अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीने रेल्वे बोर्डाला सादर केले आहे. गणेशोत्सवातील नियमित गाड्यांचे आरक्षण खुले होताच अवघ्या दोन ते तीन मिनिटातच आरक्षण फुल्ल होऊन तासन्तास तिकिट खिडक्यांवर उभ्या राहिलेल्या कोकणवासियांच्या पदरी निराशा पडली आहे. येत्या काही दिवसातच गणपती स्पेशल गाड्या जाहीर होवून आरक्षण खुले होणार आहे. गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण दोन टप्प्यात ठेवल्यास प्रवाशांना सोयीचे ठरेल.
काही अडचणींमुळे निश्चित एसआरपी शक्य नसल्यास अप आणि डाऊन दिशा निर्देशांसाठी बुकिंग वेगवेगळ्या तारखांना उघडता येते. यामुळे प्रवाशांना त्यांच्या संपूर्ण प्रवासाचे नियोजन करण्याची योग्य संधी मिळते. यासाठी योग्य पर्यायांची अंमलबजावणी केल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल. तत्काळ कोट्यावर अवलंबून असणार्यांचा भार कमी होवून बुकिंग पद्धतीत होणारा प्रकारही रोखण्यास मदत होईल, असेही निवेदनात नमूद केले आहे.




