
खेडमध्ये विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे यांचा जनता दरबार मंगळवारी
खेड : भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) प्रदेशाध्यक्ष आणि माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी (एसडीओ) संतोष साखरे यांचा जनता दरबार मंगळवारी (२८ एप्रिल) सार्वजनिक बांधकाम खात्याचे शासकीय विश्रामगृह डाग बंगला येथे सकाळी १० ते ४ या वेळेमध्ये होणार आहे.
यात खेड तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी आपल्या भागातील मंत्रालय, महसूल, आरोग्य, एसटी, महावितरण, बांधकाम खाते, जिल्हा परिषद बांधकाम, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, कृषी खाते विकास कामे, भूमी अभिलेख, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, नगर प्रशासन आणि इतर विभागातील समस्या, तसेच शासकीय दिरंगाईची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत.
नागरिकांनी आपली निवेदने घेऊन या जनता दरबारामध्ये सामील व्हावे, असे आवाहन भाजपाचे नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले आहे.




