पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपनीला दिलेली भेट चर्चेत


कोकणात एकीकडे लोटे एमआयडीसीतील प्रदूषण, लक्ष्मी ऑरगॅनिकच्या पिफास उत्पादन प्रकल्प वाद आणि नव्याने प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पांविरोधात वातावरण असताना राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी लोटे औद्योगिक क्षेत्रातील ए. बी. मौरी कंपनीला दिलेल्या खासगी भेटीने नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. मुंडे तब्बल दोन तास संबंधित कंपनीत होत्या. कंपनी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र या भेटीचे स्वरुप, चर्चेचा विषय किंवा अधिकृत उद्देश याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
शुक्रवारी सकाळी ११.५० वाजता हेलिकॉप्टरने अतिरिक्त लोटे एमआयडीसीतील असगणी येथील हेलिपॅडवर मंत्री पंकजा मुंडे यांचे आगमन झाले. विशेष म्हणजे या दौर्‍याची अधिकृत माहिती एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक प्रशासन किंवा अगदी जिल्हा भाजपलाही नव्हती, अशी माहिती पुढे आली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button