अल्पवयीन मुलाने स्वतःच्या घरातील ४ लाख २० हजार किमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना


अल्पवयीन मुलाने स्वतःच्या घरातील ४ लाख २० हजार किमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना १५ एप्रिल रोजी शहरातील उक्ताड येथे घडली. आपल्या अल्पवयीन मित्राच्या मदतीने हे सर्व दागिने शहर बाजारपेठेतील सोनारास विकण्यात आले. याप्रकरणी त्या मुलासह त्याचा मित्र व मित्राचे वडील अशा तिघांवर चिपळूण पोलीस ठाण्यात मंगळवारी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबतची फिर्याद मुलाच्या वडिलांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या वडिलांनी घरातील कपाटामध्ये ३० ग्रॅम वजनाचे ४ लाख १५ हजार किमतीचे दागिने ठेवले होते. १५ एप्रिल दरम्यानच्या कालावधीत हे दागिने चोरीस गेले. या चोरी प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेडकॉ न्स्टेबल वृशाल शेटकर, संदीप माणके, रोशन पवार, रुपेश जोगी आदीच्या पथकाने चहू बाजूने तपास सुरु केला. यावेळी काही महत्वाचे धागेदोरे त्याच्या हाती लागताच अल्पवयीन मुलाकडे पोलिसांनी चौकशी केली केली असता हा चोरी प्रकार उघडकीस आला.
त्याने हे सर्व दागिने त्याचा अल्पवयीन मित्र व या मित्राच्या वडिलांच्या मदतीने शहर बाजारपेठेतील सोनाराकडे विकले. या चोरीप्रकरणी ’त्याच्या तिघांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. हे दोन्ही अल्पवयीन मुले शिक्षण घेत असल्याची माहिती पुढे तपासात पुढे आली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button