अंत्योदय कार्डधारकांनाच मिळणार रेशन दुकानांवर रॉकेल


शासनाने रेशन दुकानांवर पुन्हा एकदा रॉकेल पुरवठा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे गोरगरीब जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाच्या या निर्णयाचा फोलपणा उघडा पडताच, रत्नागिरी तहसीलदार कार्यालयातील रेशनदुकानदारांच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. सुरुवातीला सर्वच रेशनकार्डधारकांना रॉकेल मिळणार अशी मोठी हवा केली गेली, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी केवळ ’अंत्योदय’ ग्राहकांनाच रॉकेल देण्याच्या जाचक नियमामुळे दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नागरिकांना रॉकेलचा थेंबही मिळणार नाही. केवळ ’अंत्योदय अन्न योजना’ अंतर्गत येणार्‍या अत्यंत मर्यादित लाभार्थ्यांनाच प्रति रेशनकार्ड ३ लीटर रॉकेल दिले जाणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button