मेर्वीतील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त १ मे रोजीन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा, ९ वाजता अभिषेक होईल. त्यानंतर ११ वाजता श्रीनिवास गजानन नाटेकर यांचे कीर्तन होईल. दुपारी १२.२० वाजता पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर १ वाजता आरती होईल. दुपारी १.३० वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाईल.

भाविकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button