कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्टीसाठी प्रथमच धावणार चिपळूण-दिवा मेमू


कोकण मार्गावरून धावणार्‍या रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने यंदा प्रथमच उन्हाळी, सुट्टीकरिता चिपळूण-दिवा अनारक्षित मेमू स्पेशल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १ मेपासून स्पेशल कोकणवासियांच्या सेवेत दाखल होणार आहे. आठवड्यातून शुक्रवार, शनिवार आणि रविवारी धावणार्‍या स्पेशलच्या ७ जूनपर्यंत फेर्‍या धावणार आहेत.
उन्हाळी सुट्टी हंगामासाठी अवघ्या तीनच उन्हाळी स्पेशल कोकणवासियांच्या दिमतीला आहेत. जादा विशेष गाड्या चालवण्याची मागणी होत असतानाच रेल्वे प्रशासनाने गुरूवारी सायंकाळी चिपळूण-दिवा मेमू स्पेशल जाहीर केली. ०११६०/०११५९ क्रमांकाची चिपळूण-दिवा मेमू स्पेशल १ मे ते ७ जून दरम्यान चिपळूण येथून सायंकाळी ३.३० वाजता सुटून रात्री ११.१० वाजता दिवा येथे पोहोचेल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button