महाडमध्ये कोसळलेल्या इमारतीखालीढिगाऱ्याखाली तब्बल ७० ते ८० नागरिक अडकले असल्याची भीती

रायगड जिल्ह्यातील महाड शहरात पाच मजली इमारत निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल ७० ते ८० नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं मदत कार्य सुरू केलं असून, १५ जखमींना ढिगाऱ्याखालून काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, “काजळपुरा भागातील ‘तारीक गार्डन’ नावाची इमारत कोसळली असून या इमारतीत ४५ ते ४७ फ्लॅट होते. त्यातील ७० ते ८० रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button