
महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्यात रत्नागिरी पोलीस दल कांस्यपदकाचे मानकरी

रत्नागिरी : पुणे येथे १५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या २०व्या महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्यात कोकण परिक्षेत्रातील व रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस हवालदार अमोल अरुण गमरे (नेमणूक जिल्हा विशेष शाखा, रत्नागिरी) यांनी “पोलीस फोटोग्राफी” या स्पर्धा प्रकारात सहभाग घेऊन कांस्यपदक व प्रमाणपत्र प्राप्त केले.
२०वा महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळावा-२०२५ दिनांक १५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या दरम्यान राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक-२ पुणे येथे पार पडला. या कर्तव्य मेळाव्यात “पोलीस फोटोग्राफी” या स्पर्धा प्रकारामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील एकूण ४४ पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये कोकण परिक्षेत्रातील व रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस हवालदार/१२६५ अमोल अरुण गमरे (नेमणूक जिल्हा विशेष शाखा, रत्नागिरी) यांनी “पोलीस फोटोग्राफी” या स्पर्धा प्रकारात सहभाग घेऊन कांस्यपदक व प्रमाणपत्र प्राप्त केले.
त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी विशेष अभिनंदन केले. काल (२२ सप्टेंबर) रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी पोलीस हवालदार अमोल गमरे यांना पुष्प गुच्छ देऊन गौरव केला. तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी, पोलीस उपअधीक्षक (मुख्या.) श्रीमती राधिका फडके व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे.




