ज्येष्ठ पत्रकार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांचे दुःखद निधन


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक आणि ज्येष्ठ पत्रकार वसंत विष्णू उर्फ राजाभाऊ लिमये यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते.

राजाभाऊ लिमये यांनी सामाजिक, सहकार, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय काम केले. नारळ बोर्डाचे अध्यक्ष तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी राजाभाऊ लिमये यांचे निकटचे संबंध होते. विविध सामाजिक व सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी अनेक वर्षे कार्यरत राहून आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली.

राजाभाऊ लिमये यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय, सहकार आणि पत्रकारिता क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी सायंकाळी ७ वाजता टिळक आळी येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button