महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सेवा शक्ती एस. टी. कर्मचारी संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्या निकाली न काढल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा


ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या मागण्यांसाठी एसटी प्रवाशांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आ. गोपीचंद पडळकर, आ. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील संघटनेकडून केला जाण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन करू असा इशारा सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघटनेने दिला आहे. मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सेवा शक्ती एस. टी. कर्मचारी संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्या निकाली न काढल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. वेतन, भत्ते, 7 वा वेतन आयोग आणि दिवाळी बोनस यांसह विविध मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा 28 सप्टेंबरपासून ‘आक्रमक आंदोलन’ आणि 1 ऑक्टोबरपासून मुंबईतील मुख्यालयासमोर सर्व स्तरांवरील कर्मचारी उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे आहेत. तर कार्याध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत आहेत. त्यांच्या संघटनेने 28 सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. महामंडळाची स्थावर मालमत्ता उद्योगयोग्यतेच्या धर्तीवर चालवावी किंवा शासनात विलीन करावी, अशी मोठी मागणी संघटनांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button