विविध कायदेशीर व्यवहारांमुळे रत्नागिरी जिल्हा येथे मुद्रांक (बॉंड) खरेदीत मोठी वाढ


घर खरेदी- विक्री, प्रतिज्ञापत्रे, भाडेकरार आणि विविध कायदेशीर व्यवहारांमुळे रत्नागिरी जिल्हा येथे मुद्रांक (बॉंड) खरेदीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात दरमहा सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांच्या बॉंडची विक्री होत असून, वर्षभरातील हा आकडा तब्बल १५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कायदेशीर व्यवहारांबाबत नागरिकांमध्ये वाढती जागरूकता आणि दस्तऐवजीकरणाची गरज वाढल्याने या व्यवहारांना मोठी गती मिळाल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील या कोट्यवधींच्या व्यवहारात सरकारी नोटरी आणि मुद्रांक विक्रेते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जिल्हाभरात सध्या ९५ अधिकृत नोटरी कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता केली जाते. रत्नागिरी शहरातच ६ प्रमुख स्टॅम्प व्हेंडर कार्यरत आहेत. जमीन खरेदी-विक्री, बँक कर्ज प्रक्रिया, भाडेकरार आणि शासकीय योजनांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे यामुळे या कार्यालयांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button