
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे रिक्षाला धडक; एसटी बसचालकावर गुन्हा
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे रिक्षाला धडक देणार्या एसटी बसचालकावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अपघाताची घटना ७ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली होती. सिलवंत मोहन जोंधळे (४१, रा. कारवांचीवाडी रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एसटी चालकाचे नाव आहे. तर याप्रकरणी रिक्षा चालक मनोज विजय कांबळे (४३, दाखल केली होती. रा. कुवारबाव रत्नागिरी) यांनी तक्रार एसटीची धडक बसताच रिक्षा समोरील दुचाकी हिला जाऊन धडकली होती. या अपघातात रिक्षा व दुचाकीचे नुकसान झाले.




